Skip to content
Menu

निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा राम मंदिराचे नवे CEO

September 2, 2026
मुख्य बातम्या,राजकीय

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मोठी प्रशासकीय नियुक्ती केली आहे. भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे.

जितेंद्र मिश्रा हे भारतीय हवाई दलातील अनुभवी अधिकारी आहेत. जवळपास चार दशकांच्या लष्करी सेवेनंतर ते ३० एप्रिल २०२६ रोजी एअर मार्शल पदावरून निवृत्त झाले. या काळात त्यांनी विविध महत्त्वाच्या कमांड आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या.

कारगिल युद्धात बजावली महत्त्वाची भूमिका

१९९९च्या कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलवरील कारवाईत जितेंद्र मिश्रा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय २०२५मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पश्चिम वायु कमानचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.

ऑपरेशन सिंदूरमधील योगदानाची दखल घेत त्यांना २०२५च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त युद्ध सेवा पदक (YSM) प्रदान करण्यात आले होते.

लष्करी सेवेत दीर्घ अनुभव असलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर आता अयोध्येतील राम मंदिराच्या प्रशासन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.