भारतीय Su-30MKI विमानांचा ताफा अधिक आधुनिक करण्यासाठी 177S इंजिन देण्याचा प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे. हे इंजिन सुमारे 14.5 टन थ्रस्ट देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.
या इंजिनाचा आकार विद्यमान AL-31F इंजिनासारखाच असल्याने Su-30MKI मध्ये मोठे संरचनात्मक बदल न करता त्याचा वापर करता येऊ शकतो, असे सांगितले जात आहे. यामुळे विमानाची कामगिरी सुधारण्याबरोबरच इंधन बचतीचाही फायदा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, Su-57E या रशियाच्या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाबाबतही भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. भारताने या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यास दोन्ही देशांमधील संरक्षण आणि एरोस्पेस सहकार्य आणखी मजबूत होऊ शकते.