मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुलगा पार्थ पवार आणि भावी सून कायनात दारा यांच्यासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
यावेळी पार्थ पवार आणि कायनात दारा यांनी एकत्रितपणे गणरायाच्या चरणी माथा टेकवत आशीर्वाद घेतला. दर्शनावेळी सुनेत्रा पवार आणि कायनात दारा यांच्यातील आपुलकीचे क्षणही कॅमेऱ्यात कैद झाले.
सुनेत्रा पवार यांनी कायनातला कुंकू लावण्याची पद्धत समजावून सांगितली. सासू-भावी सुनेतील हा जिव्हाळ्याचा संवाद उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
कायनात दारा यापूर्वीही सुनेत्रा पवार यांच्यासोबत अनेकदा दिसल्या आहेत. त्यानंतर पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा पार पडला होता. गणेशदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे कुटुंबीय एकत्र दिसले.