*थायरॉईडचा वाढता विळखा : कारणे, लक्षणे आणि आयुर्वेदिक दृष्टिकोन*
थायरॉईड विकार विशेषतः Hypothyroidism आज मोठ्या प्रमाणावर आढळतो. महिलांमध्ये त्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते.थायरॉईड ही गळ्याच्या पुढील भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची अंतःस्रावी ग्रंथी आहे. ती मुख्यतः T3 (Triiodothyronine) आणि T4 (Thyroxine) ही हार्मोन्स तयार करते. ही हार्मोन्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांवर परिणाम करतात— चयापचय, ऊर्जा, हृदयाची गती, शरीराचे तापमान, वजन, मनःस्थिती आणि वाढ-विकास. म्हणून थायरॉईडच्या कार्यात कमी-जास्तपणा झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर दिसू शकतो.
यामागे अनेक कारणे असू शकतात:
– Autoimmune disorders — विशेषतः Hashimoto’s thyroiditis
– आयोडीनचे कमी किंवा अति सेवन
– कुटुंबातील थायरॉईडचा इतिहास
– प्रसूतीनंतर होणारे thyroid changes
– काही औषधांचा परिणाम
– थायरॉईड ग्रंथीची सूज किंवा इतर विकार
– Hyperthyroidism मध्ये Graves’ disease किंवा thyroid nodules
– काही वेळा thyroiditis मुळे काही काळ hormone जास्त आणि नंतर कमी होऊ शकतात
1. Hypothyroidism
थायरॉईड कमी कार्यरत असल्यास
थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्यावर शरीराच्या चयापचयाची गती कमी होऊ शकते.
सामान्य लक्षणे:
• सतत थकवा व आळस
• वजन वाढणे
• थंडी जास्त जाणवणे
• त्वचा कोरडी होणे
• केस गळणे/रुक्ष होणे
• बद्धकोष्ठता
• चेहरा किंवा डोळ्यांभोवती सूज
• आवाज बसणे
• हृदयाची गती मंदावणे
• स्नायू दुखणे किंवा कमजोरी
• स्मरणशक्ती व एकाग्रता कमी होणे
• मनःस्थितीत बदल
• मासिक पाळी अनियमित किंवा जास्त होणे
• प्रजननक्षमतेवर परिणाम
2. Hyperthyroidism — थायरॉईड जास्त कार्यरत असल्यास
यामध्ये शरीराचा metabolic rate वाढतो.
सामान्य लक्षणे:
• वजन कमी होणे
• भूक वाढणे
• हृदयाची धडधड वाढणे
• हातांना कंप येणे
• जास्त घाम येणे
• उष्णता सहन न होणे
• अस्वस्थता, चिडचिड किंवा anxiety
• झोप न लागणे
• वारंवार शौचास होणे
• स्नायूंची कमजोरी
• मासिक पाळीत बदल
• केस पातळ होणे/गळणे
• काही रुग्णांमध्ये डोळे पुढे येणे — विशेषतः Graves’ disease मध्ये
*आयुर्वेदात थायरॉईडकडे कसे पाहिले जाते?*
आयुर्वेदिक चिकित्सेत रुग्णाची प्रकृती, दोष-दुष्टी, अग्नी, आम, स्रोतस, कोष्ठ, आहार-विहार आणि लक्षणसमूह यांचा विचार करून उपचाराचे नियोजन केले जाते. आयुर्वेदिक उपचारांमुळे काही निवडक रुग्णांमध्ये थायरॉईडच्या औषधांची आवश्यकता कमी होऊ शकते; काही परिस्थितींमध्ये औषधे बंद करण्याचाही विचार करता येऊ शकतो. मात्र हा निर्णय रुग्णाची प्रकृती, आजाराचे कारण, तपासण्या आणि उपचाराला मिळणारा प्रतिसाद यांचा विचार करून तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच घ्यावा. थायरॉईडची औषधे स्वतःहून बंद करू नयेत.
*Dr. Abhishek Malandkar*
BAMS MD (Ayu)
वापिका आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक
इचलकरंजी
9113611520