शिरोळ / प्रतिनिधी : शहरातील कलेश्वर तलावात ऐतिहासिक शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येईल.हे शिवस्मारक होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका सर्व शिरोळकरांनी झालेल्या बैठकीत एकमुखानी घेतली.
शिरोळ नगरपालिकेच्या दिनकररावजी यादव सभागृहात शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.शिवस्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिव-शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक सदर बैठकीस उपस्थित होते.
समितीचे सचिव अविनाश उर्फ पांडुरंग माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिव-शाहू प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवस्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिव-शाहू प्रतिष्ठानला शासन मान्यता मिळाली असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आलेल्या सूचनांचे पालन करून ऐतिहासिक असे शिवस्मारक उभारले जाईल. याकरिता शिव स्मारक आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, संग्रहालय, अभ्यासिका, बैठक व्यवस्था सर्व सोयीनुक्त असे शिवस्मारक उभारले जाणार आहे.यासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी शासन दरबारी सामूहिक प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.
आर्किटेक्ट विवेकानंद मुळीक यांनी तयार केलेल्या शिवस्मारकाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण करण्यात आले. यावेळी
कल्लेश्वर तलावात उभा करण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
शिव-शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी शिरोळकरांना अभिमान वाटेल असे ऐतिहासिक शिवस्मारक सर्वांच्या सहकार्याने उभा केले जाईल. नागरिकांनी सुचवलेल्या सूचना विचारात घेऊन काम केले जाईल असे सांगितले.
आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, राहुल यादव, नगरसेवक सचिन शिंदे, माजी नगरसेवक पंडित काळे,पै. प्रकाश गावडे, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, शिवाजी पाटील कौलवकर, प्रवीण चुडमुंगे,एम. एस. माने, दिगंबर सकट, सुरज कांबळे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी शिवस्मारक उभा करण्यासंदर्भात आपली मत व्यक्त केली.
यावेळी नगरसेविका सौ. कल्पना काळे,अनिता संकपाळ, सुवर्णा कांबळे, रेखा कोरे, दिपाली फल्ले, अनुराधा गुरव,श्वेता जाधव, शिवानी कांबळे,नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, विजय आरगे, राहुल कोळी, ओंकार गावडे,उल्हास आवळे, निलेश गावडे, अमरसिंह शिंदे, माजी सरपंच गजानन संकपाळ, बी.जी. माने, विराजसिंह यादव, धनाजी पाटील नरदेकर, रावसाहेब माने, बबन पुजारी, विवेक फल्ले, शक्तीजीत गुरव, राजेंद्र कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.